‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. ‘साधनेमुळे आध्यात्मिक पातळीत पालट होत गेल्यावर नखे आणि केस यांत काय पालट होतो ?’, याचा अभ्यास करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००४ पासून स्वतःची कापलेली नखे आणि केस तो तो दिनांक घालून संग्रही ठेवले आहेत. प.पू. डॉक्टरांच्या केसांतून विविध रंग परावर्तित होतात. यासंदर्भात एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘माझ्या केसांमधून कोणता रंग परावर्तित करायचा ?’, हेही ईश्वरच ठरवतो.’’ यातून त्यांची अहंशून्यता लक्षात आली.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२४)