तुमची दिवाळी खरेदी देशविरोधी कारवायांना प्रोत्साहित करत नाही ना ?
(टीप : हलाल म्हणजे इस्लामनुसार वैध ते)
भारतात राज्यघटना सगळ्यांनाच खाण्याचे स्वातंत्र्य देते; मात्र भारत सरकारच्या अधिकृत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना काही खासगी इस्लामी संस्थांकडून बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्रा’चा आग्रह केला जात आहे. यातून हलाल अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. वास्तविक भारताची स्वतःची अर्थव्यवस्था अस्तित्वात असतांना अशी दुसरी खासगी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणे चुकीचे आहे. हलाल प्रमाणित पदार्थांचे सेवन आणि वापर यांच्या माध्यमातून आपल्यावर हलाल अर्थव्यवस्था थोपवली जात आहे. हा व्यवसाय आर्थिकच नाही, तर धार्मिक स्तरावरही एका
विशिष्ट धर्माला झुकते माप देणारा आहे. हिंदु, शीख, जैन, बौद्ध आणि मुसलमानेतर समाजावर अन्याय करणारा आहे. युरोपमधील इंग्लंड, नेदरलँड्स समवेत ७ देशांमध्ये हलाल मांसावर प्रतिबंध आहे, तसेच हलाल अर्थव्यवस्थेचे धोके लक्षात घेऊन उत्तरप्रदेश सरकारनेही हलाल प्रमाणपत्र आणि व्यवहार यांवर संपूर्ण राज्यात बंदी आणली आहे, त्याचप्रमाणे देशभरातही हलाल प्रमाणपत्रावर बंदी आणावी आणि प्रत्येक सजग भारतियांनीही हलालचा विळखा मोडून काढावा !
१. आपले ध्येय ‘हलालमुक्त भारत’ हवे !
मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टींत केली जाऊ लागली आहे. हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१९ पासून ‘हलाल जिहाद’ विरुद्ध चळवळ राबवत आहे. समितीने व्यापारी आणि उद्योजक यांच्यासाठी ‘हलाल जिहाद’वर व्याख्याने आयोजित केली. यातून प्रेरित होऊन ते आर्थिक जिहादच्या विरोधातील समितीच्या अभियानात सहभागी होत आहेत. ‘सरकारने ‘हलाल’ प्रमाणपत्रावर त्वरित बंदी आणावी’, अशी समितीची मागणी आहे. ही मागणी आता प्रत्येक हिंदूच्या मनात उमटली पाहिजे ! भारतात दिवाळीसारख्या सणांच्या वेळी हिंदु ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे समिती ‘हलालमुक्त दिवाळी’ ही मोहिम राबवत असून यामध्ये संपूर्ण हिंदु समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन आहे. आपले ध्येय केवळ ‘हलालमुक्त दिवाळी’ नसून ‘हलालमुक्त भारत’, हे असायला हवे.
२. ‘हलाल अर्थव्यवस्था’ – राष्ट्रावरील एक मोठे संकट !
अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर ‘हलाल अर्थव्यवस्था’ आणि ‘जिहादी आतंकवाद’ यांचाही संबंध जोडला जात आहे. ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या आधारे कोट्यवधी रुपये गोळा करणारी ‘जमियत-उलेमा-हिंद’ ही संघटना ११ जुलै २००६ या दिवशी झालेल्या मुंबई रेल्वे बाँबस्फोट प्रकरणासह अनेक आतंकवादी प्रकरणांमधील अनुमाने ७०० आरोपी आतंकवाद्यांना कायदेविषयक साहाय्य करत आहे. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ‘हलाल अर्थव्यवस्था’ ही एक मोठे संकटच बनलेली आहे.
३. अल्पसंख्यांकांची हुकूमशाही !
सर्वांत धक्कादायक, म्हणजे शुद्ध शाकाहारी ‘नमकीन’पासून सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, धान्य, तेल, यांसह साबण, शँपू, टूथपेस्ट, काजळ, लिपस्टिक आदी सौंदर्यप्रसाधनेही ‘हलाल प्रमाणित’ होऊ लागली आहेत. इंग्लंडमधील विद्वान निकोलस तालेब यांनी याला ‘मायनॉरिटी डिक्टेटरशीप’ (अल्पसंख्यांकांची हुकूमशाही) असे म्हटले आहे. हे असेच चालू राहिले, तर ही देशासाठी धोकायदायक ठरू शकते. भारताची ‘इस्लामीकरणा’कडे वाटचाल होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘हलाल’चे हे सर्व धन इस्लामिक बँकांकडे जात आहे. ‘हलाल व्यवस्था’ ही हुकूमशाही आहे.
What is Halal certification ? 🚨
An international conspiracy to create a parallel economy by interfering in Hindus’ trade and business.
A dictatorship of minority Muslims over the majority!
Let us pledge !
This #Diwali_SayNoToHalal
From हलाल मुक्त दिवाली, to हलाल मुक्त भारत!… pic.twitter.com/4hkQiooVc9— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) October 30, 2024
४. ‘हलाल’विरोधी कृती समिती’ची स्थापना !
‘हलाल अर्थव्यवस्थे’ला संघटितपणे विरोध करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ‘हिंदु जनजागृती समिती’च्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना होऊ लागली आहे. यामध्ये समाजातील उद्योजक, व्यावसायिक, अधिवक्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, राष्ट्रनिष्ठ नागरिक, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, तसेच हिंदु धर्मप्रेमी यांना सहभागी करण्यात आले आहे. या माध्यमातून ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात आंदोलन उभे केले आहे.
५. उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्रासह विकल्या जाणार्या सर्व खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी !
‘अन्न पदार्थ आणि उत्पादने यांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खासगी संस्थांना नाही’, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना काही खासगी इस्लामी संस्था बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्र’ देऊन व्यापार्यांची मोठ्या प्रमाणावर लुट करत आहेत. कोणताही अधिकार नसतांना हलाल प्रमाणपत्र देऊन व्यापार्यांकडून पैसे उकळणार्यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे ज्या इस्लामी संघटना पैसे गोळा करतात, त्या पैशांचा वापर आतंकवादी संघटना आणि राष्ट्रविरोधी कारवाया यांसाठी केला जातो’, अशी तक्रार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे, तसेच छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदर्श घेऊन केंद्र सरकार आणि देशातील अन्य राज्यांनीही असा प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
६. बांधवांनो लक्षात ठेवा, ‘आपला उत्सव.. आपली खरेदी.. आपली माणसं !’
अवैध ‘हलाल अर्थव्यवस्थे’पासून राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान चालू करण्यात आले आहे. प्रत्येक हिंदूने दिवाळीमध्ये ‘हलाल’ प्रमाणीकरणाच्या भीषणतेविषयी विविध माध्यमांतून जनजागृती करणे, शासनाला निवेदन देणे आदी प्रकारे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानामध्ये सहभागी व्हावे. ‘हिंदुजागृती डॉट ओआर्जी’ या संकेतस्थळावरून स्वाक्षरी अभियानही राबवण्यात येत आहे, त्यामध्ये सहभागी व्हा ! राष्ट्रविरोधी हलाल अर्थव्यवस्थेला साहाय्य करू नका ! त्यासाठी ‘हलाल’ प्रमाणित मिठाई, पदार्थ, भेटवस्तू, सौंदर्यप्रसाधने इत्यादी खरेदी करू नका ! ‘राष्ट्रविरोधी हलाल’च्या दुष्परिणामांविषयी अन्यांनाही जागृत आणि कृतीशील करा अन् सरकारलाही यावर गंभीरपणे कृती करण्यास बाध्य करावे. हिंदूंनी हे लक्षात ठेवायला हवे, ‘आपला उत्सव.. आपली खरेदी.. आपली माणसं !’
७. हिंदू जागृत झाल्यास यश निश्चित मिळेल !
यंदा देशभर ‘आपली दिवाळी, हलालमुक्त दिवाळी’ अभियान चालू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ‘हलाल सक्तीविरोधी आंदोलने’, व्यापारी बैठका, मंडळांच्या बैठका, ऑनलाईन याचिका, जागृती करणारे फ्लेक्स फलक, व्याख्याने, निवेदनांवर स्वाक्षरी करण्याचे अभियान, हस्तपत्रकांचे वितरण, तसेच अन्य माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. या अभियानात सहभागी होऊन हिंदूंना राष्ट्रीय भावनेतून जागृत करणे महत्त्वाचे आहे. हिंदू जागृत झाल्यास यश निश्चित मिळेल, हे लक्षात घ्यायला हवे.
– श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती. (२७.१०.२०२४)
‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था हटवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेऊया !‘हल्दीराम’, ‘हिमालया’, ‘नेस्ले’ यांसारख्या अनेक कंपन्या त्यांचे शाकाहारी पदार्थही ‘हलाल प्रमाणित’ करून विकत आहेत. हलालची ही सक्ती का ?, भारतातील हिंदूंना खाण्याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्वातंत्र्य का नाही ? त्यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करावी, तसेच जसा चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकला, तसाच या हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करावा. – श्री. सुनील घनवट |