पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७ विमानांमध्ये बाँब ठेवल्याची अफवा पसरवणारा संदेश पुन्हा पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीकांत वडगावकर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘अॅडम अलांझा १०००’ या नावाने सामाजिक माध्यमांत खाते वापरणार्या एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अफवेचा परिणाम विमान वाहतूक सेवेवर होत असून त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
‘इंडिगो एअरलाइन्स’च्या गुरुग्राम येथील खात्यावर ‘अॅडम अलांझा १०००’ या नावाने संदेश पाठवण्यात आला. त्यानुसार पाटणा ते पुणे, बेंगळूर ते पुणे, कोलकाता ते पुणे या विमानांची पडताळणी करण्यात आली होती. आता असाच ‘२००८ बाँम्बिंग’ या खात्यावरून संदेश मिळाला आहे. ‘विस्तारा एअरलाइन्स’ या आस्थापनचे सिंगापूर ते पुणे, ‘अकासा एअरलाइन्स’चे कोलकाता ते पुणे, ‘इंडिगो एअरलाइन्स’चे पुणे ते जोधपूर, कोलकाता ते पुणे या विमानांमध्ये बाँब ठेवण्यात आल्याची अफवा संदेशाद्वारे पसरवण्यात आली.
संपादकीय भूमिका :
|