|
ढाका (बांगलादेश) – इस्लामचा कथित अवमान केल्याच्या आरोपाप्रकरणी बांगलादेशातील फरीदपूर जिल्ह्यात २८ ऑक्टोबरला इयत्ता ११वीत शिकणार्या हृदय पाल या हिंदू विद्यार्थ्याला धर्मांध मुसलमानांच्या जमावाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर हृदय पाल याला अटक करून सैन्याच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी सैनिकही हृदय पालला मारहाण करत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. सध्या बांग्लादेशातील कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांसमवेत सैन्याकडून हाताळली जात आहे.
जमावाकडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यात सैन्याकडून हृदय पाल याला अटक केली जात असतांना धर्मांधांकडून त्याला मारहाण केली जात आहे. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आल्याचे दिसत आहे.
यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना !
यापूर्वी अशीच घटना खुलना येथील उत्सव मंडळासमवेत घडली होती, जिथे सामाजिक माध्यमांद्वारे महंमद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्याला जमावाने मारहाण केली होती.
अलीकडेच चांदपूर जिल्ह्यातील गोविंद यांच्या घरावरही स्थानिक धर्मांध मुसलमान संघटनांनी आक्रमण केले होते. गोविंद यांच्यावरही महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता.
हिंदुविरोधी कट !
बांगलादेशातील हिंदू संघटनांचा आरोप आहे की, कटाचा एक भाग म्हणून सामाजिक माध्यमांवर हिंदूंच्या नावाने बनावट खाते उघडून अशा पोस्ट प्रसारित करून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. याच्या निषेधार्थ हिंदु संघटना सातत्याने निदर्शने करत असून सुरक्षेची मागणी करत आहेत; मात्र बांगलादेश सरकार त्यांच्या मागण्या ऐकूनही घेत नाही, तर धर्मांध मुसलमान संघटनांनी केलेल्या तक्रारींवरून हिंदूंना अटक केली जात आहे.
संपादकीय भूमिका
|