गोव्यात आस्थापनांचे व्यवस्थापन, वैयक्तिक गाठीभेटी, फलक लावणे आदींद्वारे अभियानाविषयी व्यापक जागृती
फोंडा, २६ ऑक्टोबर – यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हिंदु राष्ट्र समन्वय समिती ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान राबवत आहे. या अंतर्गत राज्यातील किराणा दुकानांचे मालक, ‘मॉल’चे व्यवस्थापन, किराणा मालाची विक्री करणार्या सहकारी संस्थांचे व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी आदींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे हाऊसिंग बोर्ड, मंदिरे आदी सार्वजनिक ठिकाणी ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानामध्ये सहभागी होण्याविषयी फलक लावण्यात आले असून हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही मोहीम गोव्यात पेडणेपासून म्हापसा, पणजी, फोंडा, डिचोली, मडगाव आणि काणकोणपर्यंत गोवाभर सर्वत्र राबवण्यात आली.
‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
गेल्या काही वर्षांपासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ (हलाल प्रमाणित) होऊ लागली आहेत. भारत सरकारच्या अधिकृत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (FDA) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची आवश्यकताच काय? ‘हलाल प्रमाणिकरण’ व्यवस्थेतून मिळणार्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. या अघोषित हलाल सक्तीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान राबवले जात आहे. आस्थापनांनी अशा प्रकारच्या हलाल प्रमाणित उत्पादनांची विक्री थांबवून ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानास सहकार्य करावे.
अभियानाच्या अंतर्गत आतापर्यंत प्रत्यक्ष संपर्क करण्यात आलेली आस्थापने
‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत आतापर्यंत डिचोली येथील ‘गोवा बागायतदार’ शाखा, ‘डीजी मार्ट’, दीनदयाळ संस्था, बार्देश बाजार आदींचे व्यवस्थापन, फोंडा येथे ‘गोवा बागायतदार’चे संचालक अधिवक्ता नरेंद्र सावईकर, गोवा सहकार भांडारचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काशीनाथ नाईक, ‘गोवा फलोत्पादन मंडळा’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्रहास देसाई, ‘गोवा बागायतदार’चे काणकोण शाखेचे व्यवस्थापन आदींच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत.
मोहिमेत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी, सामाजिक संघटना आदींचा सहभाग
डिचोली येथे मोहिमेच्या अंतर्गत विविध आस्थापनांच्या व्यवस्थापनाचे प्रबोधन करतांना ह.भ.प. किरण तुळपुळे, सर्वश्री कृष्णा मराठे, विजय होबळे, सत्यवान म्हामल, सिद्धेश्वर नाईक, पापुराज मयेकर, मंदार गावडे, शुभम हरमलकर, अशोक नाईक, दत्तराज पळ, गोविंद साखळकर आदींनी सहभाग घेतला. पणजी येथे निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामदास सावईवेरेकर, आनंद मांद्रेकर आणि मिलिंद कारखानीस यांनी सहभाग घेतला. काणकोण येथे हिंदुत्वनिष्ठ श्री. विकास शेट यांनी सहभाग घेतला. फोंडा येथे गोमंतक संत मंडळ कीर्तन विद्यालयाचे श्री. देवानंद सुर्लकर, तपोभूमी-कुंडई येथील श्री संत समाजाचे श्री. विराज ढवळीकर यांनी सहभाग घेतला. ‘हिंदु युवा शक्ती, म्हापसा’ने मोहिमेत सहभाग घेऊन निरनिराळ्या मंदिरांमध्ये याविषयी जागृती केली.
विविध मंदिरे आणि मठ यांमध्ये घेण्यात आली ‘हलालमुक्त दिवाळी’ प्रतिज्ञा
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय चलन, परकीय भाषा, परकीय न्यायव्यवस्था यांचा त्याग करून स्वभाषा, स्वत:चे चलन आणि स्वत:ची व्यवस्था कार्यवाहीत आणली. इंग्रजांच्या काळात विदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशी साहित्याचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. याचप्रमाणे आम्ही राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुरक्षित रहाण्यासाठी हलाल प्रमाणित वस्तू यापुढे खरेदी न करण्याची प्रतिज्ञा करतो’, अशी प्रतिज्ञा शिवोली येथील स्वामी समर्थ मठ आणि राज्यातील इतर मंदिरांमध्ये घेण्यात आली.
गोवा सहकार भांडारचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काशीनाथ नाईक यांनी हलाल प्रमाणित वस्तूंची सूची मागितली आहे. ‘टप्प्याटप्प्याने हलाल प्रमाणित एकेका वस्तूंची विक्री अल्प करता येईल’, असे ते म्हणाले.
अभियानाविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया
१. ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानावरून संपर्काच्या वेळी गोवा सहकार भांडारचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काशीनाथ नाईक म्हणाले, ‘‘आम्ही हलाल प्रमाणित काही वस्तू अल्प केल्या आहेत. मी स्वत:सुद्धा घरी हलाल प्रमाणित वस्तू आणत नाही’’
२. हलाल प्रमाणित उत्पादनांची सूची असल्यास पाठवून द्यावी. गोवा बागायतदार व्यवस्थापनाच्या बैठकीत हा विषय मांडून यावर उपाययोजना करता येईल ! – हिंदुत्वनिष्ठ श्री. वसंत बेहरे