ठाणे येथील चि. वैज्ञयी खोडवेकर (वय ५ वर्षे) हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

चि. वैज्ञयी खोडवेकर

१.  वय ३ ते ४ वर्षे

१ अ. इतरांच्या चुका सांगणे : ‘कु. वैज्ञयी आई-बाबा, तिची मोठी बहीण, आजी-आजोबा, घरातील गृहकृत्य साहाय्यक यांच्याकडून काही चुकलेले दिसले की, लगेच स्पष्टपणे सर्वांना चुका सांगते. तसेच मित्र-मैत्रिणी यांच्याकडून अयोग्य कृती झाली की, त्यांनाही ती लगेच स्पष्टपणे चुका सांगते.

१ आ. गुरूंप्रती भाव : वैज्ञयीला पोटाचे त्रास आहेत. तिला अपचन, उलटी होणे, खोकला-सर्दी वारंवार होणे इत्यादी त्रास होतात. त्रास होत असतांना ती गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून ‘ते मला लवकर बरे करणार आहेत. प.पू. आहेत ना, मग ते मला बरे करतील !’, असे म्हणते. ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ काढून शांतपणे बराच वेळ पहात रहाते.

सौ. मृण्मयी खोडवेकर

१ इ. तिला लहानपणापासून देवतांचे जप आणि स्तोत्रे ऐकायला अन् म्हणायला आवडतात.

१ ई. भाव वृद्धीसाठी केलेले प्रयत्न : ती आजीकडे (सुप्रिया गायकवाड यांच्याकडे) गेल्यावर आजी तिला भावजागृतीचे प्रयत्न करायला सांगते. ती ते भावजागृतीचे प्रयोग आवडीने आणि भावपूर्ण करते. आजी सांगायची, ‘चला आता परम पूज्य गुरुदेवांच्या खोलीत जायचे आणि त्यांच्या चरणांशी झोपायचे आहे. कृष्णाच्या कुशीत झोपायचे आहे.’ तेव्हा ती लगेच डोळे बंद करून तशी भावपूर्ण कृती करते.

१ उ. क्षमायाचना करणे : वैज्ञयीकडून चुकीच्या कृती झाल्या की, तिला वाईट वाटते. ती ‘मला क्षमा करा’, असे लगेच म्हणते.

२. वय ४ वर्षे

२ अ. नामजप करणे : वैज्ञयी माझ्या समवेत ठाणे येथील सेवाकेंद्रात येते. तिला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप लिहीत जा’, असे सांगितले होते. तेव्हापासून तिच्याकडून मी प्रतिदिन २ पाने दत्ताचा नामजप लिहून घेते. आश्रमात एक साधिका म्हणाल्या, ‘‘तिचा चेहरा बघितला की, मला कुलदेवीचे रूप दिसते.’’

२ आ. प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे : माझी आई, म्हणजे तिच्या आजीने (सुप्रिया गायकवाड यांनी) तिला प्रार्थना करावयास सांगितल्यावर ती लगेच हात जोडून प्रार्थना करते. ती पूजा करतांना आणि झोपतांना प्रार्थना करते. तिला हव्या असलेल्या वस्तू मिळाल्या की, ती लगेच कृतज्ञता व्यक्त करते.

३. स्वभावदोष : मनासारखे व्हावे, असे वाटणे; चटकन राग येणे.’

– सौ. मृण्मयी सुशील खोडवेकर (आई), ठाणे, (१.५.२०२४)