तीन ऋणे असतात – देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण. देवऋण यात ‘इष्ट’ आणि ‘पूर्त’ यांचा समावेश होतो. इष्टात आपण पूजा आणि यात्रा वगैरे जे करतो, ते समाविष्ट होते अन् पूर्त म्हणजे समाजाकरता काहीतरी करणे. आपल्याजवळ जे ज्ञान आहे, तेवढे जरी दुसर्याला दिले, तरी ऋषिऋणाची फेड होते. पितृऋण फेडणे, म्हणजे आपल्या संततीला पूर्ण संस्कारित करून समाजाला चांगला नागरिक देणे. जो ही ३ ऋणे फेडत नाही, त्याचा अधःपात होतो.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘कर्मसंन्यासयोग’)