आज आपल्याला भगवंताची ओळख नाही; म्हणून त्याचे रूप ठाऊक नाही; परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. सध्यासुद्धा त्याचे नाम घेतांना त्याची आठवण आपल्याला होते, हा आपला अनुभव आहेच. भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे ? एक राम ‘काळा’, तर एक राम ‘गोरा’ असतो; एक राम ‘लहान’, तर एक ‘मोठा’ असतो; पण सर्व रूपे एका रामाचीच ! भगवंत स्वत: अरूप आहे; म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे, तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले, तरी चालते. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज