पुढच्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कॅनडातील शीख समुदायाच्या मतांवर लक्ष ठेवून खलिस्तानी चळवळीला जाणूनबुजून राजाश्रय देणारे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारताने जोरदार धक्का दिला आहे. भारताने कॅनडातील आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावले आणि कॅनडाच्या अधिकार्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले.
प्रथमच भारताने इतके टोकाचे पाऊल उचलले आहे. खलिस्तानी चळवळीला उघडपणे पाठिंबा देणार्या कॅनडा आणि काही युरोपीय देशांसाठी हा इशारा आहे ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, पुणे. (१५.१०.२०२४) |