|
ढाका (बांगलादेश) – येथील तांतीबाजारमधील दुर्जापूजा मंडपावर एका व्यक्तीने पेट्रोल बाँब फेकल्याची घटना ११ ऑक्टोबरच्या रात्री घडली; मात्र या बाँबचा स्फोट झाला नाही. या वेळी मंडपाच्या सुरक्षेसाठी असणार्यांनी बाँब फेकणार्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे काही साथीदार पुढे आले आणि त्यांनी चाकूने ५ जणांवर आक्रमण केले. यात हे सर्व जण घायाळ झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाश, हृदोय आणि जीवन अशी त्यांची नावे आहेत.
JUST IN FROM #Bangladesh !
Today evening in Old #Dhaka, Tantibazaar Pooja Mandap was attacked with petrol bombs.
Many suffered casualties.
Four of them have been rushed to the Midford Hospital.
CCTV footage emerges!#BangladeshiHindus #HindusAreNotSafeInBangladesh pic.twitter.com/89YCxs7M9G
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 11, 2024
येथील कोट्याळी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी इनेमुल हसन यांनी सांगितले की, रात्री ८ च्या सुमारास काही चोरट्यांनी मंडपामधील एका महिलेची सोनसाखळी हिसकावून नेली. तेथे उपस्थित लोकांनी चोरट्यांना रोखले असता त्यांनी ५ जणांवर चाकूने आक्रमण केले. या चोरांनी बाटलीही फेकली. त्यात रॉकेल भरून त्याचा बाँब म्हणून वापर केल्याचे बोलले जात आहे; मात्र बाटली फुटली नाही. ती बाटली लोकांना घाबरवण्यासाठी फेकण्यात आली होती. लोकांनी घाबरून जावे आणि त्यांच्या भीतीचा लाभ घेऊन पळून जावे, अशी चोरट्यांची इच्छा होती.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात सध्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना पहाता दुर्गापूजा मंडपावर पेट्रोल बाँब फेकण्याचा प्रयत्न हिंदू कशाला करतील ? चोरटे हिंदू असू शकतील; मात्र ते पेट्रोल बाँब फेकतील, यावर कोण विश्वास ठेवणार ? |