चांगले कर्म करण्यासाठी शरीर, मन आणि बुद्धी यांचा संयोग हवा !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

‘कायेन मनसा बुद्ध्या’, (शरीर, मन आणि बुद्धी) योगी जो आहे तो या तिन्ही पातळ्यांवर कर्म करतो. अशा कर्मांचा उपयोग जर होत असेल, तर आत्मशुद्धीकरता होतो. त्यापेक्षा प्रगत असेल, तर जगत्कल्याणाकरता होतो. ‘प्रत्येक कर्म चांगले व्हावे’, असे वाटत असेल, तेव्हा शरीर, मन आणि बुद्धी यांचा संयोग असावाच लागतो. संकल्प मनात असावा लागतो. विवेक बुद्धीत असावा लागतो आणि कौशल्य शरिरात असावे लागते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती      (संदर्भ : ग्रंथ ‘कर्मसंन्यासयोग’)