#SamoohikTarpan : हिंदु धर्मरक्षणार्थ प्राणार्पण केलेल्या ८० कोटी पूर्वजांसाठी २ ऑक्टोबरला ‘सामूहिक तर्पण’ विधी करा !

  • प्रखर हिंदुत्वनिष्ठ मीनाक्षी शरण यांचे जगभरातील हिंदूंना आवाहन !

  • देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

इंदूर (मध्यप्रदेश) – गेल्या १ सहस्र ४०० वर्षांमध्ये (इस्लामचा उदय झाल्यापासून) भारताला अनेक विदेशी आक्रमणांना आणि आक्रमकांनी घडवून आणलेल्या धर्मांतराला सामोरे जावे लागले. या कालावधीत हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी लढतांना अनुमाने ८० कोटी हिंदूंनी प्राणार्पण केले. दुर्दैवाने अशा प्रकारे मारल्या गेलेल्यांचे अंतिम संस्कार किंवा त्यांच्या वंशजांकडून वार्षिक श्राद्धविधीही झाले नाहीत. यासाठी ‘अयोध्या फाऊंडेशन’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने सर्वपित्री अमावास्येला (२ ऑक्टोबरला) ‘सामूहिक तर्पण विधी’ करण्याचे जगभरातील हिंदूंना आवाहन केले आहे, अशी माहिती प्रखर हिंदुत्वनिष्ठ अन् संघटनेच्या संस्थापिका मीनाक्षी शरण यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.

मीनाक्षी शरण पुढे म्हणाल्या की,

१. केवळ वर्ष १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी ५० लाख निष्पाप हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. हिंदूंच्या इतिहासामध्ये त्यांच्या बलीदानाची नोंदही घेतली गेली नाही.

२. हिंदूंचे बलीदान हे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे धार्मिक नरसंहाराचे उदाहरण होय. हिंदूंचा हा नरसंहार ज्यूंच्या नरसंहारापेक्षा २ सहस्र पटींनी अधिक आहे; मात्र जागतिक समुदायाचे त्याकडे लक्ष वेधण्यास हिंदु समाज अपयशी ठरला आहे.

३. नैतिकदृष्ट्या भ्रष्ट इतिहासकारांनी हा प्रचंड नरसंहार विद्यार्थ्यांपासून दूर ठेवला. स्वतंत्र भारतातील पिढ्या हेच शिकून वाढल्या की, हिंदु एक गुलामी मानसिकतेचा समुदाय आहे, तसेच त्याच्यावर आक्रमणकर्त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार राज्य केले.

४. तथापि हिंदूंची प्रतिष्ठा आणि शौर्य जर इतके क्षीण होते, तर १ सहस्र ४०० वर्षांच्या आक्रमणानंतरही ८० टक्के संख्या कशी राखू शकले, हा प्रश्‍न उपस्थित होतो.

‘सामूहिक तर्पण विधी’ला मिळत असलेला प्रतिसाद !

सामूहिक तर्पण विधी

२ ऑक्टोबरला सकाळी १०.३० ते १२ या वेळेत पुढील ठिकाणी सामूहिक तर्पण विधीचे आयोजन करण्यात आले आहे :

१. उत्तराखंड : हरिद्वार येथील चंडी घाट या ठिकाणी होणार मुख्य तर्पण विधी ! येथे ‘सोशल बलूनी पब्लिक स्कूल’चे ५० विद्यार्थी सहभागी होतील.

२. हिमाचल प्रदेश :

अ. चंबा जिल्हा : भलाई, तिस्सा, पांगी, कुगती, साहो आदी ठिकाणी

आ. कुल्लू जिल्हा : मलाणा, कैस, कसोल, शोझा आदी ठिकाणी

इ. कांगडा जिल्हा : धर्मशाला, पालमपूर, देहरा आदी ठिकाणी

ई. सोलन जिल्हा : चंबाघाट, बडोग, कंडाघाट आदी ठिकाणी

उ. सिरमौर जिल्हा : कुमारहट्टी, कोटला, जैतपूर, रैत आदी ठिकाणी

३. उत्तरप्रदेश : देवहा नदी घाट, बरखेरा, जिल्हा बरेली आणि शिवमंदिर, ठूठीबारी, जिल्हा महाराजगंज

४. मध्यप्रदेश : नील गंगा सरोवर, उज्जैन; कातर घाट, मोरटक्का, ओंकारेश्‍वर; मां नर्मदा घाट, मोरटक्का येथे २१ युवक आणि युवती सामूहिक तर्पण करतील.

५. महाराष्ट्र : श्री ओंकारेश्‍वर देवस्थान, पुणे आणि एन्.आर्.आय. कॉम्प्लेक्स, नवी मुंबई

हिंदूंचा नरसंहार

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारचे उपक्रम हिंदु जनजागृती करण्यासाठी अत्यंत आवश्यक असून मीनाक्षी शरण यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे !

  • हिंदूंनी अशा उपक्रमांतून बोध घ्यावा आणि इतिहासातून शिकून हिंदु धर्मरक्षणार्थ सिद्ध व्हावे, ही अपेक्षा !