पुणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) ९ सप्टेंबरला सायंकाळी अनंतात विलीन झाले. महाराजांचा सनातनवर विशेष स्नेह होता. त्यांच्यावर १० सप्टेंबरला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत दर्शन, दुपारी ३ वाजता मंदिरातून अग्निसंस्कारासाठी प्रस्थान आणि सायंकाळी ४ वाजता नारायणपूर, ता. पुरंदर येथील यज्ञकुंडाजवळ अग्निसंस्कार करण्यात आले.