सैफानला २ दिवस पोलीस कोठडी
कुडाळ – तालुक्यातील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी सैफान जावेद शेख (वय १९ वर्षे ) या रत्नागिरी येथील युवकावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट (दाखल) करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
३ सप्टेंबरला कुडाळ तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी ‘बाजारात जाऊन येते’, असे सांगून घरातून गेली होती. त्यानंतर ती परत घरी आलीच नाही. याविषयी पालकांनी ती मित्रांसमवेत गेल्याचा संशय व्यक्त केला होता. याविषयी पालकांनी सोमवारी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने अन्वेषण चालू झाले आणि मुलगी रत्नागिरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीसह संशयित सैफान जावेद शेख याला रत्नागिरी येथून कह्यात घेऊन त्याला अटक केली.
संपादकीय भूमिकादेशात फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’चे भीषण स्वरूप जाणून हिंदूंनी त्यांच्या मुलींना त्याविषयीचे दुष्परिणाम लक्षात आणून देऊन सतर्क करावे ! |