कोल्हापूर – इचलकरंजी येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ प.पू. संतोष कोळी तथा बाळ महाराज यांना पाकिस्तानमधून अज्ञात धर्मांधाने धमकी दिली आहे. ‘आप हिंदुत्व का काम करते हो । जादा हिंदू हिंदू मत करो नही तो ठोक देंगे । आप कहा जाते है, कहा रहते है, क्या बोलते है, ये सब हमे मालूम है । जादा मत बोलो ‘सर तन से जुदा कर देंगे’ (शिर धडापासून वेगळे करणार), अशी धमकी त्या अज्ञात धर्मांधाने दिली आहे. संबंधित धर्मांधाने २० ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.४३ वाजता ‘व्हॉट्सअॅप’द्वारे दूरभाष करून प.पू. बाळ महाराज यांना धमकी दिली. प.पू. बाळ महाराजांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे २९ ऑगस्टला ‘ई-मेल’द्वारे तक्रार केली आहे.
धर्माचे काम करतांना अशा कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही घाबरत नाही ! – प.पू. बाळ महाराज
या संदर्भात प.पू. बाळ महाराज म्हणाले, ‘‘आम्ही हिंदुत्वाचे, हिंदु धर्माचे काम हातात घेतले आहे, ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटण्यासाठी नाही. १७ ऑगस्टला कोल्हापूर येथील हिंदु धर्म परिषद झाल्यावर ही धमकी आली आहे. अशा कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही घाबरत नाही. हे कार्य ‘सतीचे वाण’ आहे. उद्या हा देह असेल अथवा नसेल; मात्र धर्माचे कार्य चालूच राहिल. देव-देश-धर्म यांचे काम चालूच राहिल !’’
संपादकीय भूमिका
|