रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला आलेली अनुभूती !

 

सौ. सत्यभामा जाधव

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील छायाचित्रात पाहिलेला रामनाथी आश्रम प्रत्यक्षात पहायला मिळाल्याने आनंद आणि भावजागृती होणे : ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहाण्याची संधी मिळाली. आश्रमात प्रवेश केल्यावर ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात पाहिलेला ‘सनातन आश्रम’ मी प्रत्यक्षात पहात आहे’, या विचाराने मला आनंद होत होता. त्या वेळी माझी भावजागृती होत होती. सर्व साधकांचा सेवा करतांनाचा आनंद आणि भाव पाहून मला पुष्कळ छान वाटत होते. ‘माझी काहीच पात्रता नसतांना गुरुदेवांनी मला इतकी मोठी संधी दिली’, याबद्दल माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.’

– सौ. सत्यभामा प्रकाश जाधव, पलूस, जिल्हा सांगली. (१.३.२०२४)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक