वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौर्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, युक्रेनमध्ये चालू असलेला संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नात साहाय्य करणार्या देशांचे अमेरिका स्वागत करते. हा संघर्ष थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची कीव भेट उपयुक्त ठरेल.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी म्हणाले की, युक्रेन संघर्षावरील कोणत्याही वाटाघाटींसाठी युक्रेनने चर्चेसाठी येणे आवश्यक आहे.