काही पोलिसांना ठेवले ओलीस !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतात असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यात २१ ऑगस्टच्या रात्री दरोडेखोरांनी पोलिसांच्या पथकावर रॉकेटने आक्रमण केले. यामध्ये ११ पोलीस जागीच ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले. काही पोलिसांना ओलीसही ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने या आक्रमणाची माहिती दिली आहे.
Attack on Pakistan Police: 11 police officers killed in an attack by bandits with guns and rocket-propelled grenades !
Some police officers taken hostage!
The fact that bandits are attacking the police with rockets in economically crippled Pakistan shows the dire state of… pic.twitter.com/i82QFuIeK3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 23, 2024
ही घटना ‘माचा पॉइंट’ या भागात घडली. येथे पोलिसांची दोन वाहने चिखलात अडकली. तोपर्यंत तेथे काही दरोडेखोर आले आणि त्यांनी पोलिसांवर रॉकेटने आक्रमण केले. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी या आक्रमणाची गंभीर नोंद घेतली आहे. तसेच पोलीस महानिरीक्षक डॉ. उस्मान अन्वर यांनी घटनास्थळी पोचून दरोडेखोरांनी ओलीस ठेवलेल्या पोलिसांची सुटका करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
संपादकीय भूमिकाआर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानातील दरोडेखोर रॉकटने पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून तेथील सुरक्षाव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, हे लक्षात येते ! |