कोल्हापूर – बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, महिलांवरील वाढते अत्याचार, महंत रामगिरी महाराज यांना समर्थन आणि त्या संदर्भात मुसलमान समाजाने कोल्हापूर येथील धरणे आंदोलनात केलेली हिंदुविरोधी वक्तव्ये, तसेच हिंदुत्वावरील विविध आघात यांच्या निषेधार्थ २३ ऑगस्टला सकल हिंदु समाजाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ‘कोल्हापूर बंद’चे आवाहन केले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शाळा-महाविद्यालये, व्यावसायिक, व्यापारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाने केले आहे.
बंदला शिवसेनेचा पाठिंबा ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना
कोल्हापूर – हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाने जो बंद पुकारला आहे, त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुसलमान समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यात एकाने हिंदूंच्या विरोधात हीन दर्जाची वक्तव्ये केली. त्यांचा आम्ही निषेध करतो. या वेळी काही समाजकंटकांनी टाळ्या वाजवल्या. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करतो. यापुढील काळात अशी वक्तव्ये झाल्यास आणि हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी चेतावणी राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.