ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये शेख हसीना यांच्या विरोधात किराणा दुकानदाराच्या खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १९ जुलै या दिवशी ढाक्यातील महंमदपूर भागात पोलिसांनी आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणार्यांवर गोळीबार केला होता. त्यात किराणा दुकानाचा मालक अबू सईद ठार झाला होता. या प्रकरणात अन्य ६ आरोपी आहेत. यात शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर, माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान कमाल, माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून, गुप्तचर शाखेचे माजी प्रमुख हारुनोर रशीद, माजी पोलीस अधिकारी हबीबुर, माजी सह पोलीस आयुक्त बिप्लब कुमार सरकार यांचा समावेश आहे.