Waqf Board Bill : (म्‍हणे) ‘वक्‍फ बोर्ड मुसलमान समाजाचा असल्‍याने त्‍यात हस्‍तक्षेप करू नये !’ – मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या

कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांचे विधान

मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या

बेंगळुरू (कर्नाटक) – केंद्र सरकार अल्‍पसंख्‍यांकविरोधी आहे. त्‍यामुळेच वक्‍फ बोर्डाच्‍या संदर्भात सुधारणा करत आहे. वक्‍फ बोर्ड हा त्‍या समाजाचा कायदा आहे. त्‍यात आपण हस्‍तक्षेप करू नये, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी व्‍यक्‍त केली.

हिंदूंच्‍या मंदिरांवर सरकारचे नियंत्रण का ? – सामाजिक माध्‍यमांतून प्रश्‍न

सिद्धरामय्‍या यांच्‍या विधानावर सामाजिक माध्‍यमांतून टीका होत आहे. ‘वक्‍फ बोर्ड मुसलमानांचा आहे. त्‍यांच्‍या धर्माच्‍या संदर्भात आपण हस्‍तक्षेप करू नये; पण हिंदूंच्‍या मंदिराच्‍या हुंडीत तुम्‍ही हात घालू शकता का ? हिंदूंच्‍या मंदिरांवर सरकारचे नियंत्रण का ?, असे प्रश्‍न विचारले जात आहेत.

संपादकीय भूमिका 

  • वक्‍फ बोर्ड मुसलमानांचा नाही, तर भारतीय राज्‍यघटनेनुसार देशाचा आहे आणि त्‍यात पालट करता येऊ शकतो, हे राज्‍यघटनेनेच सांगितलेले आहे. त्‍यात यापूर्वीही पालट झाले आहेत !
  • मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी घटनाविरोधी विधाने करणारे एका राज्‍याचे मुख्‍यमंत्री आहेत, हे लज्‍जास्‍पद !