पुणे येथे ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्याची मागणी !

मंचर येथील प्रांत कार्यालयात निवेदन देतांना उपस्थित धर्माभिमानी

पुणे, ६ ऑगस्ट (वार्ता) – यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍याला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. ३ ऑगस्ट या दिवशी मंचर येथील प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री योगेश पिंगळे महाराज, यादव चासकर, अमोल ढगे, नवनाथ वाळूंज (सरपंच, वाळूंजवाडी), नामदेव खैरे, मार्तंड डेरे, सुशांत थोरात उपस्थित होते. या वेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ५ ऑगस्ट या दिवशी रणरागिणी शाखेच्या महिलांच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्त्या सीमा साळुंखे उपस्थित होत्या.

निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देतांना रणरागिणी शाखेच्या महिला