विशाळगडासह छत्रपती शिवरायांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त व्हावेत ! – हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी मूक आंदोलन !

छत्रपती शिवाजी महराज चौकात आंदोलन करताना हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कोल्हापूर – विशाळगडासह सर्वच गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मूक निदर्शने करण्यात आली. यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रथमेश गावडे, श्री. रामभाऊ मेथे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या फलकांवर ‘आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे !’, ‘तुझ्या गडांची ही व्यथा, आता राजा कळू दे सार्‍या जगास’, ‘गड-दुर्गांनी राखले स्वराज्य, गड दुर्गांनी स्थापिले स्वराज्य !’, ‘मोकळा श्वास घेण्यासाठी वाट पहातो आहे विशाळगड !’, ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा, शिवकालीन इतिहासाचे जतन करा !’, ‘मुक्त झाला प्रतापगड; आता वाट पहातोय विशाळगड ! ‘ना हाजी का ना काझी का, हर गड है छत्रपती शिवाजी महाराज का ।’, असे जागृतीपर लिखाण लिहिण्यात आले होते.