Hang  Murderer Yashshree Shinde : यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला फाशी द्या !

राजापूर येथील तहसीलदारांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु समाज यांच्या वतीने निवेदन

राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा-निवेदन 

राजापूर, ५ ऑगस्ट (वार्ता.) – उरण येथील कु. यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भर चौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा, या मागण्यांचे निवेदन राजापूर येथील तहसीलदार कार्यालयात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि समस्त हिंदु समाज यांच्या वतीने ५ ऑगस्टला देण्यात आले. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासाठीचे हे निवेदन निवासी नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडित यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

या वेळी सौ. श्रुती ताम्हणकर, सौ. गौरी अभ्यंकर, विश्व हिंदु परिषदेच्या सौ. माधवी हर्डीकर, भाजपच्या सौ. सुयोगा जठार, माजी नगरसेविका सौ. शीतल पटेल, सौ. विनया शेट्ये, सुश्री सुधा चव्हाण, श्रीमती प्रतिभा मराठे, सौ. संजीवनी मालपेकर, भाजप  जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, राजाभाऊ रसाळ, संदेश टिळेकर, हिंदु जनजागृती समितीचे विनोद गादीकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे महेश मयेकर, बजरंग दलाचे निकेश पांचाळ, ओंकार मित्र मंडळाचे अध्यक्ष विवेक गुरव यांच्या सह अनेक हिंदुत्वनिष्ठ या वेळी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.


या निवेदनात म्हटले आहे की, उरण येथील क. यशश्री शिंदे (वय २२ वर्षे) हीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण संपूर्ण देशाला झाली आहे. ही केवळ पहिली घटना नसून आतापर्यंत अनेक हिंदु मुलींना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आलेले आहे. एकूणच राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला गायब होत असतील, तर यामागे काही षड्यंत्र तर नाही ना? लव्ह जिहादचा प्रकार तर नाही ना? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे.  राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा. या प्रकरणात काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना, जिहादी नेते  आढळून आल्यास त्यांच्यावरही तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

प्रतिक्रिया :

१. सौ. श्रुती ताम्हणकर : यशश्रीचा मारेकरी दाऊद शेखला अधिकाधिक म्हणजेच फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.

२. सौ. गौरी अभ्यंकर : महाराष्ट्र शासनाची ‘लाडकी बहीण’ ही योजना आहेच; पण त्याचबरोबर लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करून ती भेट जर बहिणीला मिळाली, तर अधिक चांगले होईल.