बत्तीस शिराळा येथील तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन
बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व (खासदारकी) तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बत्तीस शिराळा येथे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाणे येथे देण्यात आले.
या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री शरद नायकवडी, संजय पाटील, अशोक मस्कर, प्रवीण पाटील, किरण गायकवाड, माणिक पाटील, बाबूराव गायकवाड, योगेश कुलकर्णी आणि संपत पाटील उपस्थित होते.