स्वारगेट पोलिसांची कारवाई, १० निर्देशांचे पालन करण्याचे आदेश !
पुणे – येथील सारसबाग येथील गणपति समोर गर्दी जमवून आरती केल्याप्रकरणी हिंदु कार्यकर्ते संग्राम उपाख्य अक्षय ढोले पाटील या तरुणावर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, तसेच पोलिसांनी त्यांना १० निर्देशांचे पालन करण्याचे आदेश दिल्याचेही समजते. सारसबाग येथे नमाज पठण करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक पवित्र घेतला. त्यानुसार प्रतिशुक्रवारी शिववंदना करण्याचे नियोजन संग्राम पाटील यांनी केले होते. त्याविषयी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. (नमाजपठण चालते, तर शिववंदना का चालत नाही ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक) या घटनेचा हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी निषेध व्यक्त केला आहे.