अँजेला रेनर उपपंतप्रधान
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवणार्या मजूर पक्षाचे नेते किर स्टार्मर ब्रिटनचे ५८ वे पंतप्रधान बनले आहेत. अँजेला रेनर यांना उपपंतप्रधान करण्यात आले आहेत, तर रेचेल रीव्हस या ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनवल्या आहेत.
ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे १९ जण विजयी झाले आहेत. यापूर्वी १५ जण विजयी झाले होते. आता ही संख्या वाढली आहे.
निवडणुकीत विजयी झालेले भारतीय वंशीय नेते
सोजन जोसेफ, शिवानी राजा, कनिष्क नारायण, सुएला ब्रेव्हरमन, ऋषी सुनक, प्रीत कौर गिल, प्रीती पटेल, डॉ. नील शास्त्री हर्स्ट, वरिंदर जस, तमनजीत सिंह ढेसी, लिसा नंदी, सीमा मल्होत्रा, गुरिंदर सिंह जोसन, सोनिया कुमार, जस अठवाल, बॅगी शंकर, सतवीर कौर, हरप्रीत उप्पल आणि नादिया व्हाइटोम, अशी निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या नेत्यांची नावे आहेत.