आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत सुंदर मूर्ती
बुलढाणा – येथील सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन यांचे काम अनेक महिन्यांपासून चालू आहे. त्यांच्या समाधीसमोरच उत्खनन करतांना श्रीविष्णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्य मूर्ती सापडली आहे. ही सुरेख आणि रेखीव मूर्ती आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत सुंदर मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. ही मूर्ती साधारणपणे अकराव्या शतकातील असल्याची चर्चा आहे.
Magnificent moorti of Shri Vishnu and Shri Lakshmi devi found during excavation in Buldhana!
The most beautiful moortis in the history so far#ASI #Hinduism pic.twitter.com/cKbnWE44Mo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2024
आगामी काळात या सर्व परिसराचे बारकाईने उत्खनन करण्यात येणार असल्याचे भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांनी सांगितले आहे.