Karachi Hindu girl kidnapped : पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर !

१३ दिवसांत दुसरी घटना

कराची – येथील शाहदाबकोट टाउन येथे समीर अली नावाच्या तरुणाने संगीता नावाच्या १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. पाकिस्तानातील ख्रिस्ती कार्यकर्ते फराज परवेझ यांनी ही माहिती उघड केली. धर्मांतरानंतर तिचे हमीदा असे नाव ठेवण्यात आले आहे. संगीता अल्पवयीन असूनही समीर अली याने तिच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून तिचे वय १९ वर्षे दाखवले. त्यानंतर त्याने तिच्याकडून बलपूर्वक प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. १३ दिवसांत अशा प्रकारच्या २ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.


२ जूनला सोहाना शर्मा नावाच्या १४ वर्षीय मुलीचे तिच्या आईसमोरच शिकवणी शिक्षकाकडूनच अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले होते. यानंतर तिचा पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह लावून देण्यात आला होता. सोहाना हिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर ५ दिवसांनी आरोपीला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी पीडित मुलीने सांगितले की, सर्व काही तिच्यासमवेत बलपूर्वक घडले असून तिला वडिलांसमवेतच रहायचे आहे. असे असतांनाही न्यायालयाने तिला त्याच्या वडिलांसमवेत पाठवले नाही.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकार याविषयी पाकला खडसावत का नाही ? हिंदूंची ही दुःस्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !