‘व्होट जिहाद’ श्री मुंबादेवीच्या चरणांपर्यंत पोचला ! – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या

(‘व्होट जिहाद’ म्हणजे मुसलमानांनी ठरवून उमेदवाराला एकगठ्ठा मतदान करणे)

मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीत मुंबादेवी मतदारसंघात व्होट जिहाद झाला. तो मुंबादेवीच्या चरणांपर्यंत पोचला आहे, असा आरोप माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ३८ मतदान केंद्रांवर भाजपप्रणीत महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना एक आकडी मते, तर ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना ३११ मते मिळाली, असे किरीट सोमय्या म्हणाले. मुसलमानबहुल मतदानकेंद्रांमधील मते ठाकरे गटाच्या उमेदवाराला पडली आहेत.