ब्रह्मोत्सवानिमित्त झालेला चंडीयाग ‘ऑनलाईन’ पहातांना जळगाव येथील श्री. नीलेश पाटील यांना  जाणवलेली सूत्रे !

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’निमित्त १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला. त्याचे ‘ऑनलाईन’ प्रसारण पहातांना साधकाला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

श्री. नीलेश पाटील

अ. ‘चंडीयाग रामनाथी आश्रमात चालू होता; परंतु यज्ञात दिलेल्या आहुतीचा सुगंध मला जळगावमध्ये माझ्या घरात येत होता.

आ. ‘माझे शरीर, मन आणि बुद्धी यांवर आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण यज्ञाच्या ज्वाळांत खेचले जात आहे अन् माझा त्रास न्यून होत आहे’, असे मला जाणवत होते.

इ. मला पुष्कळ ढेकरा येत होत्या. त्या वेळी ‘शरिरातील काळी (त्रासदायक) शक्ती बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले.

ई. यज्ञ पहातांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डोळ्यांतील तेज आणि चैतन्य मला मिळत आहे’, असे जाणवत होते.

उ.    यज्ञ बघतांना मला पुष्कळ झोप येत होती.’

– श्री. नीलेश पाटील, जळगाव (१५.५.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक