‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ (जीव हेच जिवाचे अन्न आहे) हा मूलमंत्र सांगणार्या सनातन हिंदु संस्कृतीत पंचमहाभूतांनाच देव मानले आहे. त्यामुळे साहजिकच मानवाला सांभाळणारा निसर्ग पूजनीय आहे. १२ सहस्रांहून अधिक काळ शेतीचा इतिहास असणारी आपली संस्कृती आहे, असे पुरावे मिळतात. सहस्रो वर्षे आपण नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून, तसेच ‘निसर्गदेवो भव ।’ (निसर्गदेवतेला नमस्कार असो.) या संस्कृतीमुळे आपले पर्यावरण उत्तमरित्या सांभाळले होते.