छत्रपती संभाजीनगर येथे बिअर बार आणि उपाहारगृहे रात्री ११ नंतरही चालूच !

राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यांच्यामुळे अवैध धंदे जोरात !

छत्रपती संभाजीनगर – ‘शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत शहरात रात्री ११ वाजल्यानंतर अनेक बार आणि उपाहारगृहे चालू असतात. मद्य पिण्यासाठी येणार्‍यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे’, असे ‘डीबी स्टार’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये समोर आले. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बार अन् उपाहारगृहे यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच अवैध धंदे जोरात चालू आहेत. त्यामुळे संबंधितांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

‘डीबी स्टार’च्या प्रतिनिधीने सिडको पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील ६ ते ७ बार आणि उपाहारगृहे यांची पहाणी केली, तेव्हा रात्री ११ वाजल्यानंतर अनेक बारमध्ये प्रवेश मिळत होता, तर काही बार आणि उपाहारगृहे यांचे मुख्य दरवाजे बंद असले, तरी इतर छुप्या दरवाज्यांतून प्रवेश दिला जात होता. गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे हा व्यवसाय चालू आहे.

संपादकीय भूमिका :

असे असेल, तर त्यांच्यावरच कारवाई होणे आवश्यक !