पुणे – पुणे शहर आता अमली पदार्थांचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था, पोलीस-प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यांमुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत आहे. या विरोधात पुणेकरांच्या भावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ मे या दिवशी तीव्र आंदोलन करण्यात आले. कोयता गँगची दहशत, शहरात नेहमीच घडणार्या गोळीबाराच्या घटना, अमली पदार्थांचा सुळसुळाट, अनधिकृत पब आणि बाराला असलेले प्रशासनाचे पाठबळ अशा अनेक गोष्टींचा तीव्र निषेध या वेळी करण्यात आला. पुणे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, शेखर धावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.