वडणगे (जिल्हा कोल्हापूर) येथील जागा ‘वक्फ’ने बळकावल्याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गाव बंद !

हिंदूंच्या भूमीवरील वक्फ मंडळाच्या आघाताच्या निषेधार्थ हिंदूंचे एकत्रीकरण स्वागतार्ह !

कोल्हापूर – वडणगे येथील महादेव मंदिराशेजारील जागा आणि दुकानाचे गाळे यांचा निकाल ‘वक्फ’च्या बाजूने लागला असून तळ्याशेजारील २ एकर भूमीही ‘वक्फ’च्या नावावर झाली आहे. विशेष म्हणजे या गावात ९० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदु असूनही ही जागा बळकावण्यात ‘वक्फ’ यशस्वी झाले आहे. तरी याला विरोध करण्यासाठी सकल हिंदु समाज वडणगे यांच्या वतीने शुक्रवार, २४ मे या दिवशी गाव बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. (वक्फ बोर्डाला कायद्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत. देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत हिंदूंची अशी भूमी ‘वक्फ बोर्डा’ने गिळंकृत केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता संसेदत कायदा संमत करून ‘वक्फ बोर्ड’ला दिलेले अधिकार रहित करावेत ! – संपादक)