वाईट मार्गाने आलेली संपत्ती एकाएकी नष्ट होणे आणि धर्माने आलेली संपत्ती चिरस्थायी असणे

 प्रतिकात्मक छायाचित्र

‘पुरुषार्थ आणि पुण्य यांच्या वृद्धीने लक्ष्मी येते. दान, पुण्य आणि कुशलता यांमुळे लक्ष्मी वाढते. संयम आणि सदाचार यांनी ती स्थिर होते. पाप, मनस्ताप आणि भय यांनी आलेली लक्ष्मी भांडण अन् भीती निर्माण करते. ती १० वर्षांत नष्ट होते. जसे कापसाच्या गोदामाला आग लागल्यावर सर्व कापूस नष्ट होतो, तसेच वाईट मार्गाने आलेली संपत्ती एकाएकी नष्ट होते. उद्योग, सदाचार, धर्म आणि संयम यांनी सुख देणारे धन मिळते. ते धन ‘बहुजन सुखाय ।’ प्रवृत्ती निर्माण करवून लोक-परलोकांत सुख देते आणि चिरस्थायी असते.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)