गोड, गोजिरी, कोमल अन् निरागस असे आमची श्रियाताई ।

‘४.५.२०२४ या दिवशी कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) हिचा १३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या काकांनी तिच्यावर केलेली कविता येथे दिली आहे.

कु. श्रिया राजंदेकर

गोड, गोजिरी, कोमल अन् निरागस असे आमची श्रियाताई ।
सतत असते तिला सर्वांना खाऊ देण्याची (टीप) घाई ।
करतांना ही सेवा ती नेहमी देवाच्या अनुसंधानात राही ।
बोलणे इतके गोड अन् नम्र की, जणू ती प्रत्येकात भगवंत पाही ।। १ ।।

श्री. योगेश जलतारे

‘सेवा करतांना मिळते चैतन्य’, असा असे तिचा भाव ।
सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण करण्याचा असतो तिला ध्यास ।
म्हणूनच तिच्या हृदयी असतो नित्य गुरूंचा वास ।
हे आहे तिचे आणखी एक गुणवैशिष्ट्य खास ।। २ ।।

अशा आमच्या लाडक्या ताईचा असे वाढदिवस ।
निमित्त साधून या दिनाचे करतो प्रार्थना गुरुचरणी होऊन लीन ।
घ्या गोड मानून सेवा तिची अन् उजळू दे तिचे दिव्यत्व ।
समष्टी कल्याणास्तव शीघ्रतेने करावे प्रदान तिला संतत्व ।। ३ ।।

टीप : प्रसाद देण्याची

– श्री. योगेश जलतारे (कु. श्रियाच्या वडिलांचे आतेभाऊ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक