रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे साधक श्री. चेतन हरिहर यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.
अशा आहेत आमुच्या श्रीसत्शक्ति (टीप १) ।
साधकांच्या आहेत त्या आध्यात्मिक आई ।। १ ।।
स्मरण करताच त्यांचे, मन होते शांत ।
काय सांगू त्या आनंदाला नाही अंत ।। २ ।।
साधकांसाठी करते देवी (टीप २) सर्वकाही ।
देवीच्या एका शब्दाने सुटते अडचण आणि सर्वकाही ।। ३ ।।
अवतरली देवी साधकांसाठी ।
मार्ग सोपा केला ईश्वरप्राप्तीसाठी ।। ४ ।।
कशी वर्णू श्रीसत्शक्ति यांची गुणसंपदा ।
सांगत गेलो तर आयुष्यही अल्प पडेल ।। ५ ।।
स्वीकारले तुम्ही आम्हाला गुणदोषांसहित ।
‘सांभाळा, कृपा करा अन् दया करा’, अशी प्रार्थना करतो याचनेसहित ।। ६ ।।
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः नमन ।
टीप १ : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ : महर्षींनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना ‘महालक्ष्मीस्वरूप’ असे संबोधले आहे.
– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |