पंजाबमधील काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचे संतापजनक विधान !
(इलेक्शन स्टंट मध्ये म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांचे लक्ष वेधून घेणारी केलेली कृती )
चंडीगड – पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी पुंछमधील आतंकवादी आक्रमण हा भाजपचा ‘इलेक्शन स्टंट’असल्याचे म्हटले आहे. चन्नी म्हणाले, ‘मागच्या वेळीही निवडणुका आल्यावर अशा प्रकारची स्टंटबाजी करून भाजपने विजय मिळवला होता. भाजपचा हा जिंकण्यासाठीचा स्टंट असून त्यात तथ्य नाही, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरमदील पूंछ जिल्ह्यात हवाईदलाच्या ताफ्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात एका सैनिकाला वीरमरण आले, तर ४ सैनिक घायाळ झाले. या आक्रमणात सहभागी आतंकवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम चालू आहे. या प्रकरणी अनेकांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाभारताला अस्थिर करू पहाणार्या आतंकवाद्यांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी आपले सैनिक जिवाची पर्वा न करता त्यांना सामोरे जातात आणि देशवासियांचे रक्षण करतात. असे असतांना अशा आतंकवादी आक्रमणांना ‘इलेक्शन स्टंट’ संबोधून काँग्रेसवाल्यांनी वीरमरण आलेल्या सैनिकांचा घोर अपमानच केला आहे. हा देशद्रोहच नव्हे का ? |