ब्रह्मचर्य

‘कुठल्याही क्षेत्रात विकारवशता माणसाचे अधःपतन घडवून आणते आणि विकारावरील आत्मसत्ता त्याचा अभ्युदय घडवून आणते. म्हणजेच विकाराचा संग घातक असतो आणि विकाराशी निःसंगत्व साधता आले, तर धर्माेचित विकार उपभोगूनही आत्मोद्धारापासून वंचित होत नाही. या प्रक्रियेतूनच मानसिक तथा शारीरिक बलाचे संपादन होत असते. त्यालाच खर्‍या अर्थाने ‘ब्रह्मप्राप्तीकरता केलेले हेतूपूर्वक आचरण’, असे म्हणावे. तेच ब्रह्मचर्य होय; म्हणूनच ब्रह्मचर्य अतीव महत्त्वाचे ठरते.’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)