पुणे येथे विवाहाचे आमीष दाखवून सैनिकाचा महिलेवर बलात्कार !

प्रतीकात्मक चित्र

पुणे – राहुल पाटील हा सैन्यामध्ये नोकरी करतो. त्याचा विवाह झाला आहे. विवाह झाल्यानंतरही त्याने एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वत:ची माहिती दिली होती. त्यातून त्याची नागपूरमधील एका ३५ वर्षीय महिलेशी ओळख झाली. विवाहाचे आमीष दाखवून त्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सैनिक राहुल पाटील याच्यासह रवींद्र पाटील, शारदा पाटील आणि पूजा पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (असे नैतिकता खालावलेले सैनिक सैन्यात असणे धोकादायक ! – संपादक)