Odisha Love Jihad : ओडिशातील माजी सरकारी अधिकार्‍याची मुलगी पडली लव्ह जिहादला बळी !

मुलीला वाचवण्यासाठी अधिकार्‍याची योगी आदित्यनाथ यांना विनंती !

(डावीकडे) माजी सनदी अधिकारी सारंगी यांच्यासह त्यांची पत्नी (उजवीकडे) आरोपी अब्दुर्रहमान

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशातील माजी सनदी अधिकारी सारंगी यांनी त्यांची मुलगी लव्ह जिहादला बळी पडल्याची तक्रार केली आहे. अब्दुर्रहमान नावाच्या एका तरुणाने त्यांच्या एकुलत्या एक मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘जर माझ्या मुलीच्या सुटकेसाठी तातडीने कारवाई केली नाही, तर तिचा जीव जाऊ शकतो’, असे त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना म्हटले आहे.

१. या निवृत्त सनदी अधिकार्‍यांनी त्यांचा व्हिडिओ पाठवला असून ‘माझ्या मुलीला कशाही प्रकारे वाचवा’, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. व्हिडिओत माजी सनदी अधिकारी सारंगी यांच्यासह त्यांची पत्नीही दिसत आहे. ते भूवनेश्‍वरमध्ये रहतात. त्यांनी यात म्हटले की, वर्ष २०१८ मध्ये त्यांच्या मुलीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे. त्यांनी तपास केला, तर मुलगी उत्तरप्रदेशातील मेरठमधील मवाना या भागात आढळली.

२. पुढे सारंगी यांची पत्नी म्हणते, ‘कर्नाटकच्या नेहा हिरेमठ या मुलीच्या हत्येनंतर आम्हाला चिंता वाटू लागली आहे. आमची एकुलती एक मुलगी लव्ह जिहादची शिकार बनली आहे. आम्ही तिला मुलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न केले; मात्र त्यात आम्ही अपयशी ठरलो. काही प्रशासकीय अधिकारी आमच्यावर दबाव टाकत आहेत. आमच्या मुलीच्या जिवाचे काही बरे वाईट होण्यापूर्वी सरकारने काही ठोस उपाय करावा. योगी आदित्यनाथ यांच्याकडे आम्ही आर्जव करत आहोत की, यातून आम्हाला बाहेर काढावे. माझ्या पतीने देशाची ३५ वर्षे सेवा बजावली. माझ्या एकूलत्या एका मुलीला जर काही झाले, तर आम्ही जगू शकणार नाही.’