सत्र न्यायालयाने सप्टेंबर २०२३ मध्ये दिली होती जन्मठेपेची शिक्षा !
मुंबई – हिंदु प्रेयसीच्या भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या निजाम असगर हाशमी याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला. हाशमी याने प्रेयसीचा चुलतभाऊ उमेश इंगळे याचे शीर कापून त्याची हत्या केली होती. न्यायालयाने घटनास्थळी मिळालेल्या मनुष्याचा रक्ताचा अहवाल मानला नाही. हाशमी साडेपाच वर्षे कारागृहात राहिल्याने त्याला सोडावे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.
वर्ष २०१८ मध्ये उमेश इंगळे हा व्यायामशाळेत जाण्यासाठी बाहेर पडला होता आणि पुन्हा घरी परतलाच नाही. पुण्यातील कोंढवा येथे इंगळे याचे धडविरहित शव आढळून आले होते. त्याच दिवशी एकाने संध्याकाळी इंगळे याला हाशमीसमवेत पाहिले होत. पोलिसांना इंगळे याचे शव ३ दिवसांनंतर मिळाले होते. यानंतर सत्र न्यायालयाने सप्टेंबर २०२३ मध्ये हाशमी याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.