गुरुराया, मनातल्या मनात मी तुझ्या समीप रहातो ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सागर निंबाळकर यांना कवीवर्य सुरेश भट यांच्या एका कवितेवरून सुचलेली आध्यात्मिक कविता येथे देत आहोत.

तुला न पहाता तुला मनोमनी अनुभवतो ।
मनातल्या मनात मी तुझ्या समीप रहातो ।। धृ.।।

श्री. सागर निंबाळकर

असाच ये तू धावून, कर बंध (टीप १) माझे मोकळे ।
मी निर्बुद्ध इतका, योग्य-अयोग्य तेही न कळे (टीप २) ।

गुरुमाऊली, प्रतिदिन मी तुझी वाट पहातो ।
मनातल्या मनात मी तुझ्या समीप रहातो ।। १ ।।

आता मला गोड वाटे, साधनेतील एकटेपणा (टीप ३) ।
तुझी रूपे विविध देवा (टीप ४), जिथे तिथे करती खुणा (टीप ५) ।

तुझ्या विविध रूपांसमवेत मी नित्य नवा मला भेटतो ।
मनातल्या मनात मी तुझ्या समीप रहातो ।। २ ।।

हो या हृदयी आसनस्थ, वाहीन तुझ्या चरणी फुले ।
क्षणोक्षणी अनुसंधानी राहून सांगीन गूज मनीचे ।

तुझे अस्तित्व, तुझी कृपा मी नित्य अनुभवतो ।
मनातल्या मनात मी तुझ्या समीप रहातो ।। ३ ।।

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१०.१.२०२४)

टीप १ – भवसागराचे बंधन

टीप २ – ‘योग्य वेळ येताच, गुरु त्या-त्या साधकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे आवश्यक ते सर्व देतात’, हे ठाऊक असूनही त्यांच्याकडे बंधमुक्तीची मागणी करणे

टीप ३ – ‘व्यष्टी साधना करूया’, असे वाटणे

टीप ४ – साधक, प्रचारसाहित्य, विविध सेवा इत्यादी

टीप ५ – विविध प्रचारसेवा

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक