‘अयोध्येत स्थापन झालेल्या ५ वर्षांच्या श्री रामलल्लाच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेतल्याने सर्व जण राममय झालेले आहेत. या सुंदर मूर्तीला घडवणारे मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.
१. मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
१ अ. अहं अल्प आणि भाव अधिक असणे : मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांचा अहं अल्प आहे. त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव अल्प आहे. त्यामुळे त्यांच्या कलेतून अहं न जाणवता भाव जाणवतो. त्यांनी घडवलेली श्री रामलल्लाची मूर्ती भक्तीपूर्ण सिद्ध केली असून त्या मूर्तीतील चेहर्यातून ५ वर्षांच्या श्री रामलल्लाच्या मनातील भाव सहजतनेने आणि प्रकर्षाने उमटत आहेत.
१ आ. कृतज्ञताभावामुळे विनम्र स्वभाव असणे : मूर्तीकार योगीराज यांना श्री रामलल्लाची मूर्ती बनवण्याची संधी मिळाल्यावर त्यांना त्याचा मोठेपणा वाटला नाही. उलट भगवंताने त्याचे सुंदर शिल्प घडवण्याची संधी दिली’, याविषयी त्यांना कृतज्ञता वाटली. त्यांच्यातील याच कृतज्ञताभावामुळे त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र आहे. त्यामुळे श्री. योगीराज यांच्या विनम्रतेमुळे ते प्रत्येकाला आपलेसे आणि हवेहवेसे वाटतात.
१ इ. शिष्यभावामुळे गुरुकृपा संपादन करता येणे : श्री. योगीराज यांच्यामध्ये आदर्श शिष्याचे विनम्रता, आज्ञापालन, सेवा वृत्ती इत्यादी अनेक गुण आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुरुस्थानी असणार्या त्यांच्या पित्याची कृपा आहे. कृपेमुळे त्यांना शिल्पकलेचा वारसा मिळाला असून सात्त्विक शिल्प घडवण्याचे महत्त्वपूर्ण ज्ञान आणि विद्या प्राप्त झालेली आहे.
१ ई. सूक्ष्मातील कळण्याची चांगली क्षमता : श्री. योगीराज यांच्यामध्ये सात्त्विक शिल्प घडवण्याची आंतरिक तळमळ असल्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सूक्ष्मातील कळण्याची अपूर्व क्षमता आहे. या क्षमतेमुळे जेव्हा ते श्री रामलल्लाची मूर्ती घडवत होते, तेव्हा देवशिल्पी विश्वकर्मा यांनी त्यांना सूक्ष्मातून सात्त्विक शिल्प घडवण्याचे सूक्ष्म ज्ञान दिले. त्याचप्रमाणे ही मूर्ती घडवत असतांना त्यांना ५ वर्षांच्या श्री रामलल्लाचे दर्शन होत होते. त्यामुळे त्यांच्याकडून श्री रामलल्लाची परिपूर्ण मूर्ती बनवली गेली.
१ उ. भक्तीमुळे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहून भगवंताशी तादात्म्य पावणे : जेव्हा श्री. योगीराज श्री रामलल्लाची मूर्ती घडवत होते, तेव्हा ते तहान-भूक विसरून, तसेच संपूर्ण देहभान विसरून शिल्प घडवत होते. मूर्ती सिद्ध करण्याची स्थुलातील प्रक्रिया चालू असतांना मूर्तीकार श्री. योगीराज यांच्यातील भक्तीमुळे ते भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहून भगवंताचे शिल्प घडवत होते. भगवंताशी अंशात्मकरित्या एकरूप झाल्यामुळे श्री रामलल्लाचे शिल्प घडवत असतांना त्यांनी काही क्षण सायुज्य मुक्तीची अनुभूती घेतली.
२. श्री. अरुण योगीराज यांची विविध योगमार्गांनुसार झालेली साधना
३. मूर्तीकार श्री. अरुण योगीराज हे उत्तम शिष्य असून त्यांची संतत्वाकडे वाटचाल चालू असणे
मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांच्यामध्ये आदर्श शिष्याचे अनेक गुण आहेत. त्यामुळे त्यांच्यावर श्री गुरूंची कृपा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये सात्त्विक शिल्प घडवण्यासाठी आवश्यक असणारी तळमळ आणि भगवंताप्रतीचा भक्तीभाव आहे. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपाही भरभरून होत आहे. अशा प्रकारे गुरुकृपा आणि देवकृपा प्राप्त झाल्यामुळे श्री. अरुण योगीराज यांची वाटचाल शिष्यत्वाकडून संतत्वाकडे वेगाने चालू झाली आहे. ‘ते लवकर संतपद प्राप्त करतील’, असे जाणवते. श्री. योगीराज हे आदर्श शिल्पकार असून त्यांनी घडवलेले शिल्प हे केवळ शिल्पकलेच्या दृष्टीनेच नव्हे, तर अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने उत्कृष्ट अन् परिपूर्ण असते. त्यामुळे त्यांनी घडवलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वी २५ टक्के आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यावर ३५ टक्के रामतत्त्व कार्यरत झाले आहे. श्री. योगीराज यांची शिल्पकलेच्या माध्यमातून साधना होऊन त्यांना या जन्मी संतपद प्राप्त होऊन पुढील जन्मी सायुज्य मुक्ती प्राप्त होणार आहे.
४. कृतज्ञता
सर्वार्थाने आदर्श मूर्तीकार आणि शिष्य असणार्या श्री. अरुण योगीराज यांची गुणवैशिष्ट्ये या लेखाच्या माध्यमातून शिकता आली, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने हे लेखरूपभावपुष्प अर्पण करते.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२४)
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |