लागवडीच्या ठिकाणी असलेल्या घरात देवघर बनवून तिथे प्रतिदिन पूजा करू लागल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती !

१. ‘लागवड सेवेच्या ठिकाणी असलेल्या घरात देवघर असायला हवे’, असा विचार सेवा करणार्‍या तिघांच्याही मनात आल्यावर रात्री जागून देवघर बनवणे

श्री. घनश्‍याम गावडे

‘आम्हा तिघांना (श्री. रोहिदास कोरगावकर, श्री. निंगराज सनदी आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. घनशाम गावडे यांना) लागवड सेवेसाठी पाठवले होते. आम्हाला लागवडीच्या ठिकाणी रहाण्यासाठी घर आहे; मात्र त्यात देवघर नव्हते. ‘येथे देवघर पाहिजे’, असा विचार आम्हा तिघांच्याही मनात आला. त्याच दिवशी आम्ही तिघांनी मिळून रात्री ८ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत देवघर बनवून पूर्ण केले आणि त्यात गुरुदेवांचे छायाचित्र ठेवले.

२. देवघर बनवल्यावर आलेल्या अनुभूती !

श्री. रोहिदास अंकुश कोरगांवकर

अ. पूजा करतांना ‘गुरुदेवांच्या छायाचित्राच्या ठिकाणी प्रत्यक्ष प.पू. गुरुदेव बसले असून आम्ही त्यांच्या चरणांवरच फुले वहात आहोत’, असा भाव आमच्या मनात निर्माण होतो.

आ. प्रतिदिन पूजा आणि आरती करू लागल्यावर आम्हाला येथील देवघरात, घरात आणि लागवडीत देवाचे अस्तित्व जाणवते.

इ. प्रतिदिन पूजा करू लागल्यापासून आम्हाला चैतन्य मिळत आहे. लागवडीत सेवा करून थकून आम्ही घरात आल्यावर ‘आमचा थकवा उणावून आम्हाला शक्ती मिळते’, असे आम्हाला जाणवते.

ई. सेवेसाठी येथे येणार्‍या अन्य साधकांनाही देवघर, लागवडीतील घर आणि पूर्ण लागवड येथे प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते.’

– श्री. घनशाम गावडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक