Rajasthan Hindu Conversion : ५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी यांच्या आमिषाने राजस्थानमध्ये हिंदु महिलेने २ मुलांसह स्वीकारला इस्लाम !

पोलिसांनी केली एकाला अटक

जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या खैरथल-तिजारा जिल्ह्यात ५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी यांच्या आमिषाला बळी पडून एका महिलेचे तिच्या मुलांसह इस्लाम स्वीकारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महिलेच्या सासरच्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

१. तिजारा येथील नंदलाल जाटव यांनी सांगितले, ‘माझा मुलगा कृष्ण कुमार याची पत्नी मंजू ही मसाला पॅकिंग कारखान्यात काम करते. काही दिवसांपूर्वी माझा नातू पियुष याने मला सांगितले होते, ‘आई अनेक घंटे घरातून बेपत्ता असते. ती सांगते की, ‘मसाल्याचा कारखाना चालवणारा इंतेझार खान तुम्हाला (मुलांना) वडिलांसारखा आहे. घरचा संपूर्ण खर्च तो उचलतो.’ काही दिवसांतच इंतेझार पियुषच्या घरी यायला लागला. तो मंजूला दुचाकीवरून घेऊन जायचा. मुलांनी विरोध केला असता मंजूने त्यांचे ऐकले नाही. मुलांनी सांगितले की, एके दिवशी त्यांची आई दोन्ही मुलांना घेऊन इंतझारच्या घरी गेली.
घरात आधीच २ मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) उपस्थित होते. मौलवींनी दोन्ही मुलांना ‘इस्लामचे शिक्षण घ्या, अभ्यास करा आणि धर्म स्वीकारा’, असे सांगितले. दोन्ही मुलांना ५ लाख रुपये देण्याचे, तसेच सरकारी नोकरी देण्याचे आमीषही त्यांनी दाखवले. मंजू त्याविषयी सहमत झाली. काही दिवसांनी मंजूने दोन्ही मुलांना बळजोरीने तिजारा येथील मशिदीत नेले आणि इंतेझार नावाच्या व्यक्तीकडे सोपवले; मात्र संधी साधून दोन्ही मुलांनी तेथून पळ काढला आणि मला याची संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

२. या संदर्भात नंदलाल यांनी मंजू यांच्याशी बोलून या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारला. त्यामुळे मंजू आणि इंतेझार यांनी नंदलालला जीवे मारण्याची धमकी दिली. नंदलाल यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका आरोपीला अटक केली.

संपादकीय भूमिका

धर्मशिक्षण नसल्यामुळेच अशा आमिषांना हिंदू बळी पडून धर्मांतर करतात. हे लक्षात घेऊन हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक !