छत्रपती संभाजीनगर – येथील हर्सूल कारागृहाचे अधीक्षक जयंत नाईक यांची सेवानिवृत्ती झाली. त्यानंतर कारागृहाबाहेर सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मध्यरात्री मोठी मेजवानी केली. मद्य पिऊन या वेळी अधिकारी कर्मचारी यांनी तब्बल अडीच घंटे डिजे ध्वनीयंत्रणेवर धिंगाणा घातला. या गोंधळाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
काही पोलीस वर्दीतच या सर्व प्रकारात सहभागी झाले होते. या वेळी काही पोलीस स्नो स्प्रेचा फवारा करत होते. ज्यांच्यावर नियम पाळायचे दायित्व असते, त्यांनीच अशा प्रकारे सर्व नियम धुळीस मिळवले.
संपादकीय भूमिका :याचा अर्थ सुरक्षा कर्मचार्यांच्या अयोग्य हेतूंना कारागृह अधीक्षक जयंत नाईक हे आडकाठी आणत होते आणि ते निवृत्त झाल्यामुळे संबंधित कर्मचार्यांना आनंद झाला, असे समजायचे का ? |