अमेरिका नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभी राहील ! – जो बायडेन

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (डावीकडे)आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिले. यामध्ये बायडेन यांनी लिहिले, ‘जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिका नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभी राहील. विकास आणि मानवी हक्क यांच्या संरक्षणासाठी अमेरिका पाकिस्तानसमवेत एकत्र काम करत राहील.’

संपादकीय भूमिका

  • अफगाणिस्तानसमेवत भारताने संबंध ठेवण्यास चालू केल्यावर अमेरिकेला पोटशूळ उठला आहे. त्यामुळे अमेरिका आता पाकला चुचकारत आहे. सध्या भारताच्या अंतर्गत समस्यांमध्ये नाक खुपसणार्‍या अमेरिकेला भारताने या सूत्रावरून सुनावणे आवश्यक आहे !