२५ मार्च या दिवशी आपण ‘स्वभावदोष जाण्यासाठी स्वयंसूचना कशा घ्यायच्या ?’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन पाहिले. आता मनात निराशा किंवा नकारात्मक विचार आल्यावर त्यातून बाहेर पडण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, यावर केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
या पूर्वीचा भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/777292.html
३. निराशेचे विचार मनात आल्यावर ‘स्वतःला जाणीव होईल’, असे प्रायश्चित्त घेणे
श्री. अग्निवल्लभ : गुरुदेव, एखाद्या वेळी मनाची स्थिती पुष्कळच नकारात्मक होते. त्यातून बाहेर पडायला मनाला पुष्कळ समजवावे लागते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नकारात्मक विचार मनात आल्यावर ‘स्वतःला जाणीव होईल’, असे प्रायश्चित्त घ्यायचे आणि नामजप करायचा. समजावून सांगून ते काही मनाला कळणार नाही. कळले ?
श्री. अग्निवल्लभ : हो गुरुदेव. सध्या मी मानसोपचारतज्ञ यांचे उपचार घेत आहे. त्या संदर्भात माझ्या मनात येते, ‘आता उपचार चालू आहेत, त्यामुळे मी ठीक आहे; पण ते उपचार बंद केल्यावर कसे होईल ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : समज, एखाद्याला ताप येत आहे. त्याला तापावरच्या गोळ्या दिल्यावर ताप जाईल. तो ताप मलेरियामुळे आला असेल, तर मलेरिया नष्ट करणार्या गोळ्या दिल्यावर मलेरिया नष्ट होईल. मग तापाच्या गोळ्या लागणारच नाहीत. आले ना लक्षात ?
श्री. अग्निवल्लभ : हो गुरुदेव. सध्या माझ्या मनाची द्विधा स्थिती आहे. आई-वडील म्हणतात, ‘तू पूर्णवेळ साधना करू लागलास, तरी काही अडचण नाही.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अरे वा ! किती नशिबवान आहेस !
श्री. अग्निवल्लभ : पण गुरुदेव, माझ्याच मनाची स्थिती नाही. कधी सकारात्मक, तर कधी नकारात्मक विचार येतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता तो विचार करू नकोस. आता अनिष्ट शक्ती त्रास देत असतातच ना ? त्या मनात विकल्प आणतात. त्यामुळे नामजपादी उपायांकडेच लक्ष ठेव. त्यामुळे जातील ते विचार. विकल्प येतील, तेव्हा मनाला सूचना द्यायच्या आणि अधिक सत्रे करायची.
श्री. अग्निवल्लभ : हो गुरुदेव. (समाप्त)